मुंबई : अजित पवार यांनी उठाव केल्यानंतर काल राष्ट्रवादीमध्ये फ़ूट पडली. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे विरोधीपक्ष नेतापदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र, अजित पवार यांच्या बंडामुळे काँग्रेस हा राज्यातील दुस-या क्रमांकाचा पक्ष बनला असूनआता त्यांच्याकडे विरोधीपक्ष नेतापद जाते की राष्ट्रवादीकडे राहते हा प्रश्न बाकी राहणार आहे.
सध्या राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. बहुमतासाठी १४५ जागांची गरज आहे. अजित पवार गट एनडीएचे घटक नाही असे गृहित धरले तर सध्या विधानसभेत भाजपकडे १०५, त्यानंतर शिवसेना-४०, शिवसेना उद्धव ठाकरे गट – १६, राष्ट्रवादी काँग्रेस- ५३, काँग्रेसकडे ४५ आणि इतर २९ आमदार आहेत.
अजित पवार यांच्या बंडानंतर काँग्रेसकडे सर्वाधिक ४५ आमदार असतील. म्हणजेच राज्यात काँग्रेस हा दुस-या क्रमांकाचा पक्ष असेल. तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना राहील.
जितेंद्र आव्हाड यांच्या नियुक्तीमुळे मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेता एकाच जिल्ह्यातील असण्याचा एक दुर्मीळ योगायोग घडून येणार आहे.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि माझी मुख्य व्हीप आणि विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मी व्हीप जारी केल्यावर तो सर्वांना लागू होईल. जेव्हा तुम्ही मंत्रिपदाचा लाभ आणि अधिकार उपभोगता तेव्हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या पक्षाच्या अध्यक्षांशी तुम्ही अशा पद्धतीने कसे वागू शकता? अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Reviewed by ANN news network
on
७/०३/२०२३ १०:२०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: