पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी आज पदभार स्विकारला. महाराष्ट्र शासन आदेशानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची महसुल व वनविभागाकडे नियुक्ती प्रत्यार्पित करण्यात आली असल्याने त्यांच्या जागी विजयकुमार खोराटे यांची नियुक्ती करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी २००५ मध्ये पोलीस अधिकारी या पदावर शासकीय सेवेत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी वर्धा नगरपरिषद येथे मुख्याधिकारी, कोल्हापुर नगरपालिका येथे उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त, अमरावती महानगरपालिका येथे उपायुक्त तसेच सोलापूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त या पदांवर काम केलेले आहे.
पिंपरी : विजयकुमार खोराटे अतिरिक्त आयुक्तपदी रुजू
Reviewed by ANN news network
on
७/०८/२०२३ १०:१४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: