मराठवाडा : सोयगाव पंचायत समितीचा रोहयोचा तांत्रिक अधिकारी चार हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडला, कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई...
दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव पंचायत समितीच्या रोहयो तांत्रिक अधिकारी सचिन रोटे(वय ३०) यास मंजूर झालेल्या विहिरीचे मजूरीचे मस्टरप्रमाणे देयक मंजूर करण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारताना शुक्रवारी पंचायत समितीच्या कार्यालयात रंगेहाथ पकडल्याची कारवाई छत्रपती संभाजीनगर च्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोयगावात केली.
सोयगाव पंचायत समितीच्या सचिन नानासाहेब रोटे (वय३०) असे रंगेहाथ पकडलेल्याचे नाव आहे तक्रारदार यांच्या स्वतःच्या शेतीमध्ये महात्मा गांधी स्वयंरोजगार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे मजुरीचे मस्टर प्रमाणे बिल मंजूर करण्या करिता प्रतिमस्टर १०००/- रुपये या प्रमाणे पाच मस्टरचे एकूण ५०००/- रुपयांची मागणी करून तडजोडी अंती ४०००/- रुपये देण्याचे ठरले होते शुक्रवारी( दि.०७)सोयगाव पंचायत समितीच्या कार्यालयात तांत्रिक अधिकारी सचिन रोटे याने लाचेची रक्कम स्वीकारली.दरम्यान यावेळी सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले पोलीस उपाधीक्षक, ला. प्र. वि मार्गदर्शक संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर, पोलिस उप अधीक्षक आदींच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी - संगीता पाटील,पोना शिरीष वाघ,विलास चव्हाण, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे या कारवाई मुळे सोयगावात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची धाबे दणाणले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: