१० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकींसह ५ राज्यांमध्ये आउटलेट सुरू केले जातील
चेन्नई आणि बंगळूर येथे अनुक्रमे पहिले दोन स्टोअर सुरू केले
चेन्नई : बांधकाम साहित्य उद्योगाक्षेत्रातील भारतातील अग्रगण्य समूह अपर्णा एन्टरप्रायझेसने तामिळनाडूमधील चेन्नई येथे कंपनीच्या मालकीचे पहिले आउटलेट सुरू करून बी२सी व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली. या आर्थिक वर्षात ५ राज्यांमध्ये अजून २० आउटलेट सुरू करण्यासाठी १० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुक केली जाईल. कंपनीच्या मालकीचे आउटलेट्स टाइल्स, यूपीव्हीसी आणि अॅल्युमिनीयम दरवाजे आणि खिडक्यांसह टाइल्स विभागातील उत्पादनाची सुद्धा विस्तृत श्रेणी प्रदर्शित करतील. व्यवसायामध्ये अजून जास्त सखोल प्रवेश करण्यासाठी कंपनी आपली पोहोच फ्रेंचायझी मॉडेल आणि थर्ड पार्टी मल्टी -ब्रॅंड बी२सी आउटलेट्स द्वारे वाढवेल.
उद्योगक्षेत्राच्या अहवालांनुसार, बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील वाढ आणि देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारत सरकारचे प्रयत्न यामुळे भारतातील टाइल्स, यूपीव्हीसी दरवाजे आणि खिडक्यांचा देशांतर्गत वापर मागील वर्षीच्या तुलनेत (वायओवाय) ८ ते १०% नी चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढत आहे. तर अॅल्युमिनीयम दरवाजे आणि खिडक्यांचा व्यवसाय ५%च्या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढत आहे. कोविड महामारीच्या नंतरच्या जगात भारतातील मध्यमवर्गीयांची स्वतःचे घर असण्याची वाढती आकांक्षा हे अपर्णा एंटरप्रायझेसला त्याच्या बी२सी व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच त्याच्या ग्राहकांच्या जवळ जाण्याचे प्रमुख कारण आहे.
अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अश्विन रेड्डी या विकासावर भाष्य करताना म्हणाले, “२७ वर्षांपेक्षा जास्त काळामध्ये अपर्णा एंटरप्रायझेसची बी२बी विभागातील बांधकाम साहित्याच्या व्यवसायात भरभराट झाली आहे आणि आम्हाला वाटते की, आमच्या स्वतःच्या शोरूम्सच्या लॉंचसह आता बी२सी विभागामध्ये विस्तार करण्याची हीच योग्य वेळ आहे. आजचा भारतीय ग्राहक हा अत्यंत अभ्यासू आणि उत्तम दर्जाच्या निवडींकडे झुकणारा आहे. आमचे ध्येय टाइल्स, यूपीव्हीसी आणि अॅल्युमिनीयमचे दरवाजे आणि खिडक्यांच्या विभागामध्ये उत्तम दर्जाचे आणि आधुनिक श्रेणीतील सोल्युशन्स ग्राहकांच्या अधिक जवळ आणणे आहे. आम्हाला आशा आहे की, आमच्या कंपनीच्या मालकीचे आउटलेट्स पुढील ५ वर्षांमध्ये विटेरो आणि वेस्टर च्या नेतृत्वाखाली आमच्या महसुलात जवळपास १०% योगदान देतील. एक व्यवसाय म्हणून आम्ही गेल्या ४ वर्षात १५% च्या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढत आहोत आणि आम्ही चालू आर्थिक वर्षातून २००० कोटी रुपयांच्या उलाढालीचा विचार करत आहोत. आर्थिक वर्ष-२५ पर्यंत कंपनीच्या मालकीची ५० दुकाने चालू करण्याचे आमचे ध्येय आहे.”
कोची, मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर, ओडिशा आणि कोलकाता या आमच्या प्रमुख लक्ष्य केंद्रित करण्याच्या बाजारपेठा आहेत. अपर्णा एंटरप्रायझेस अनेक वर्षांपासून गोदरेज, प्रेस्टिज, महिंद्रा लाइफ स्पेस, एल अँड टी कन्स्ट्रकशन, शापुर्जी अँड पालोनजी, ब्रिगेड माय होम आणि एनसीसी सारख्या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या दिग्गजांना टाइल्स, खिडक्या व दरवाजे पुरवीत आहोत आणि कंपनी आशा करते की त्यांच्या बी२सी व्यवसायामध्ये अशाच यशाची पुनरावृत्ती होईल.
अपर्णा एंटरप्रायझेस हे अपर्णा आरएमसी, विटेरो, अपर्णा व्हेंस्टर यूपीव्हीसी विंडोज अँड डोअर्स, ओकोटेक यूपीव्हीसी प्रोफाइल, अपर्णा क्राफ्ट, अल्टेझा बाय अपर्णा क्राफ्ट आणि अपर्णा यूनिस्पेस(अग्रणी युरोपियन सॅनिटरी वेअर ब्रॅंड्ससाठी लक्झरी शो रूम) या सर्वांच्या अंतर्गत आपली उत्पादने बनवते आणि त्यांचे विपणन करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: