चिखली कुदळवाडी येथील नाल्यात उभारलेला अनधिकृत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प त्वरित पाडण्यात यावा :सायली नढे
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण यांत्रिक विभागाने चिखली कुदळवाडी येथील नाल्यात पंचवीस ते तीस पीलर टाकून अनधिकृतपणे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे या प्रकल्पाला राष्ट्रीय हरित लवाद पाटबंधारे विभाग व महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी नाही त्यामुळे हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प महानगरपालिकेने त्वरित पाडावा व झालेल्या कोट्यावधी रुपयाचा खर्च संबंधित पर्यावरण विभागातील अधिकारी व
अभियंते त्यांच्याकडून वसूल करावा व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सायली किरण नढे यांनी निवेदनाद्वारे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेस महिला पदाधिकारी स्वाती शिंदे, आशा भोसले, निर्मला खैरे, रंजना सौदेकर ह्या उपस्थित होत्या.
चिखली कुदळवाडी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाला सोडून बांधावा असे आदेश पटबंधारे विभागाने दिलेला असताना या आदेशाकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प चक्क नाल्यात बांधला आहे हा प्रकल्प करताना हरित लवादाच्या नियमांना तिलाजंली दिली गेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने नाल्यात बांधकाम केल्याने या बांधकामाला परवानगी दिलेली नाही तसेच बांधकाम विभागाने अजून या अनधिकृत बांधकामाला नोटीस पाठवलेली नाही एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना नाल्या शेजारी बांधकाम केलं तर बांधकाम विभाग त्वरित नोटीस देऊन बांधकाम पाडतात मात्र महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने नाल्यात बांधकाम करून देखील याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प त्वरित पाडावा व झालेला खर्च संबंधित अधिकारी व अभियंते यांच्याकडून वसूल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सायली नढे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: