खेड:राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय योगासन आॅलिंपियाड स्पर्धा यावर्षी भोपाळ येथे होणार आहेत .या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या टीम मध्ये एकूण सहा मुलांची निवड झाली आहे.
यामध्ये मुलांच्या संघामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक अनुज संदीप बाचीम जिल्हा परिषद शाळा धामणदिवी नं १ तृतीय क्रमांक वेदांत महेंद्र नरळकर जिल्हा परिषद शाळा धामणदिवी नं १, मुलीच्या संघामध्ये प्रथम क्रमांक- सानिका किशोर कासेकर जिल्हा परिषद शाळा धामणदिवी नं. १ द्वितीय क्रमांक- रिया राकेश हंबीर जिल्हा परिषद शाळा धामणदिवी नं १, तृतीय क्रमांक- ईश्वरी मनोज खेराडे युनायटेड इंग्लिश स्कूल( कोव्यास व्यायाम शाळा) चौथा क्रमांक - वेदिका जितेंद्र कदम जिल्हा परिषद शाळा धामणदिवी नं१. या महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळा नांदिवसे नं १ ता चिपळूण या शाळेचे शिक्षक व राष्ट्रीय योगापंच संतोष दत्ताराम जाधव यांची निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे च्या संचालिका नेहा बेलसरे,रत्नागिरी डाएटचे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, डायटच्या अधिव्याख्याता दीपा सावंत धामणदेवी गावच्या सरपंच संजीवनी संजय नरळकर ग्रामपंचायत सदस्य प्रवीण राऊत , देवस्थानचे उपाध्यक्ष संदीप गोवळकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिनेश निवाते उपाध्यक्ष रश्मी हंबीर , सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत व सर्व धामणदेवी ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: