ओडिशातील रेल्वे अपघातात २३३ जणांचा मृत्यू; ९०० जखमी

 


बालासोर : शुक्रवारी काल रात्री ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेस ट्रेनला मोठा अपघात झाला.  कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या २३३ वर गेली आहे तर 900 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.  ओडिशामध्ये आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

काल रात्री झालेल्या या भीषण अपघातात 50 ते 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मात्र मृतांचा आकडा वाढत जात तो 120 वर पोहोचला. तसेच जखमींचा आकडाही 350 वर गेला. मात्र, सकाळपर्यंत मृतांचा आकडा 233 आणि जखमींचा आकडा 900 झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे दोन्ही गाड्या एकाचवेळी एका रुळावर आल्याचे म्हटले जात आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नई ते पश्चिम बंगालमधील हावडा मार्गे ओदिशा पर्यंत धावते.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईंकांना १० लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तर, अपघातामधील गंभीर जखमींना २ लाख रुपये तर किरकोळ जखमी असणाऱ्या प्रवाशांना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे.

या अपघातानंतर आतापर्यंत 18 गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

रद्द झालेल्या एक्स्प्रेसची यादी खालीलप्रमाणे

-१२८३७ हावडा-पुरी एक्स्प्रेस (२ जून, २०२३)

-१२८६३ हावडा-सर एम विश्वेश्वैया टर्मिनल एक्स्प्रेस (२जून, २०२३)

-१२८३९ हावडा-चेन्नई मेल (२ जून, २०२३ )

-१२८९५ शालिमार-पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस (२ जून, २०२३ )

-२०८३१ शालिमार-संबलपुर एक्सप्रेस (२ जून, २०२३ )

-०२८३७ संतरागाछी-पुरी स्पेशल (२ जून, २०२३ )

-22201 सियालदह-पुरी दुरंतो एक्स्प्रेस (२ जून, २०२३ )

-१२०७४ भुवनेश्वर-हावड़ा जन शताब्दी एक्स्प्रेस (भुवनेश्वरहून २ जून, २०२३ )

-१२२७८ पुरी-हावड़ा शताब्दी एक्स्प्रेस (पुरीहून ०३ जून २०२३)

-१२२७७ हावडा-पुरी शताब्दी एक्स्प्रेस (हावड़ाहून ०३ जून २०२३)

-१२८२२ पुरी-शालीमार धौली एक्स्प्रेस (पुरीहून ०३ जून २०२३)

-१२८२१ शालीमार-पुरी धौली एक्स्प्रेस (शालिमार से ०३ जून २०२३)

-१२८९२ पुरी-बांग्रीपोसी एक्स्प्रेस(पुरीहून ०३ जून २०२३)

-१२८९१ बांग्रीपोसी-पुरी एक्स्प्रेस (बांग्रीपोसी हून ०३ जून २०२३)

-०२८२३ पुरी-संतरागाछी स्पेशल ट्रेन (पुरीहून ०३ जून २०२३)

-१२८४२ चेन्नई-शालीमार कोरोमंडल एक्स्प्रेस (चेन्नईहून ०३ जून २०२३)

-१२५०९ एसएमवीटी बंगळुरु-गुवाहाटी (बंगळुरुहून ०३ जून २०२३)

ओडिशातील रेल्वे अपघातात २३३ जणांचा मृत्यू; ९०० जखमी ओडिशातील रेल्वे अपघातात २३३ जणांचा मृत्यू; ९०० जखमी Reviewed by ANN news network on ६/०३/२०२३ ०९:४४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".