जळगाव : जळगावातील कालिका मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेवर दुचाकीवरून आलेल्या दोन सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घालून रोख रक्कम लांबवली आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
कालिका मंदिर परिसरात काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे काम सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झाले. साडेनऊच्या सुमारास मोटारसायकल वरून दोन युवक बँकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. त्याचा धाक दाखवून त्यांनी कर्मचा-यांना धमकावले. शाखा व्यवस्थापकाच्या मांडीवर शस्त्राने वार केले. आणि अवघ्या काही मिनिटात सुमारे १५ लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झाले.
या घटनेची खबर मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेतली. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळाला भेट दिली.श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. पोलीसतपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: