शैक्षणिक,सामाजिक कार्याची उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड
मंदार आपटे
चिपळूण : शैक्षणिक,सामाजिक चळवळीत सातत्याने पुढाकार घेऊन सेवा कार्य करणाऱ्या व ग्रामपंचायत गटामध्ये, तसेच महिला व बालविकास क्षेत्रात विधायक कार्य करणे, तसेच सामाजिक क्षेत्रात हिररीने भाग घेणे, महिला अत्याचारामध्ये भाग घेणे. महिला स्वयं बचत गट, आदी क्षेत्रात पेढांबे-भराडेवाडी मधील एकता योगेश पेढांबकर यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामपंचायत माजी सरपंच पूर्वी जाधव, उपसरपंच राजेंद्र कदम, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश शिंदे,सदस्या विजया पेढांबकर ग्रामसेवक व्ही. बी. गुरव, बँक सखी गौरी शिंदे, पत्रकार व ग्रामपंचायत तंटामुक्ती सदस्य योगेश पेढांबकर यांच्या उपस्थितीत यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप म्हणून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ रोख रक्कम असे आहे. एकता पेढांबकर यांना हा पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार सोहळा हा ग्रामपंचायत पेढांबे,कार्यालयात येथे झाला.
कार्यक्रमप्रसंगी संकल्प ग्रामसंघ पदाधिकारी शितल शिंदे, अश्विनी शिंदे, रजनी कदम, .पुजा शिंदे शालीनी शिंदे यांनी एकता पेढांबकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी ग्रामस्थ,अंगणवाडी सेविका,आशासेविका,महिला बचत गट, सदस्या,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रामसेवक गुरव यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: