रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालय येथे 75 फूट तर काही ठिकाणी सुमारे 45 फुट राष्ट्रध्वज येत्या 15 ऑगस्टपर्यंत उभारणीसाठी आपण स्वतः प्रयत्नशील आहोत अशी माहिती उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते .
जिल्ह्यातील लांजा, दापोली, मंडणगड,खेड, चिपळूण ,राजापूर , संगमेश्वर या तालुका मुख्यालयाच्या तर जिल्हयातील इतर ठिकाणी एकाच वेळी हा ध्वज उभारणीचा अभिनव उपक्रम राज्यात पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेकडे देण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, महाविदयालयीन तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभाग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तरित्या सामील व्हावे असे आवाहन करुन या अभिनव उपक्रमाची पूर्व तयारी 14 ऑगस्ट पूर्वी करण्यात यावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी संबंधित प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्याशी दूर दृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: