रतन बी. राऊत
मुंबई : चित्रपट सृष्टीतील सेलेब्रिटी मॅनेजर हाफिज बेग यांनी प्रोडयुस केलेल्या यांच्या दिवाज टेल एंटरटेनमेंट एल एलपी प्रस्तुत नवीन गाण्याचे नुकतेच शहरांमध्ये चित्रीकरण करण्यात आले.
कदे तो लगदा नावाच्या ह्या अल्बमचे शहरातील ड्रीम वर्ल्ड या प्रोजेक्टमध्ये नुकतेच चित्रीकरण करण्यात आले, प्रसिद्ध सिने अभिनेते पुनीत ईसर यांचे पुत्र अभिनेता सिद्धांत ईसर सह सिनेअभिनेत्री शिल्पा रायजादा अभिनेत्री नाझिया खान यांच्यावर या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले.
या अल्बमचे डायरेक्टर मनोज तिवारी असून डीओपी रवी यादव आहेत. तर, या अल्बमला सेलिब्रिटी मॅनेजर हाफिज बेग यांनी त्यांच्या दिवाज टेल एंटरटेनमेंट एल एलपी बॅनर तर्फे प्रोड्यूस केले आहे. मुंबईमध्ये लवकरच एका शानदार कार्यक्रमामध्ये फिल्मसिटीच्या नामवंत कलावंतांच्या उपस्थितीमध्ये या गाण्याचे प्रमोशन होणार आहे.
सेलिब्रिटी मॅनेजर हाफिज बेग हे गेल्या कित्येक वर्षापासून फिल्मसिटी मध्ये वेगवेगळ्या विषयाला अनुसरून दिवाज टेल एंटरटेनमेंट या आपल्या बॅनरखाली वेगवेगळ्या शहरांमध्ये सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांना घेऊन लाईव्ह शोचे आयोजन करतात. लाईव्ह शोमध्ये महाभारत, रामायण आदि विविध शोचे त्यांनी विविध शहरांमध्ये लाईव्ह शोचे आयोजन केलेले आहे, या सोबतच त्यांनी नुकतेच आपल्या नवीन गाण्याच्या अल्बमचे शहरांमध्ये चित्रीकरण करून चित्रपटसृष्टी, सिनेसंगीत जगात या अल्बमच्या रूपाने पाऊल ठेवले आहे.
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२३ ०९:४१:०० PM
Rating:

.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: