मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; राष्ट्रवादीची मागणी

 


पिंपरी :  पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अर्बन महिला सेलच्यावतीने अध्यक्षा मनिषा गटकळ यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदन देताना  मनिषा   गटकळ अध्यक्षा-अर्बन सेल,  लता ओव्हाळ माजी उपसभापती शिक्षण मंडळ तथा अर्बन सेल शहर निरीक्षक, विजया काटे अध्यक्षा-अर्बन सेल पिंपरी विधानसभा, अल्पसंख्यांक विभाग पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष युसूफ कुरेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या परिसरात मध्ये मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला, ओव्हर ब्रिजखाली, मोकट कुत्रे टोळक्याने एकत्र बसतात. येणाऱ्या जाणऱ्या नागरिकांवर जोरात भुंकत धावून जातात व चावतात, नागरिक स्वतःला वाचवताना मोठमोठे अपघात होतात त्यामुळे नागरिक गंभीर जखमी झालेले आहेत.

त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिक सकाळी-संध्याकाळी वॉकिंगसाठी बाहेर पडतात, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शाळे कॉलेज करीता जा ये करतात, महिला कामगार आणि कामगार कर्मचारी कामानिमित्त शहरांच्या विविध ठिकाणी ये जा करित असतात, तसेच इंडस्ट्रियल कंपन्यामध्ये कामगार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे कामगार सकाळी, दुपारी आणि रात्रपाळी अशे शिफ्ट मध्ये कामे करुन टु-व्हिलर किंवा वाहनाने ये जा करीत असतात अशा या कर्मचारी वर्गावर बेवारसी मोकाट श्वाने अंगावर धावून येतात व चावतात एकत्रीत हल्ले करतात त्यामुळे शहरावर भितीचे वातावरण झाले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील एकेकाळी श्रीमंत समजल्या जाणाऱ्या महानगपालिकेला राज्यापातळीवर व देशपातीळवर विविध पुरस्काराने सन्मानित केले असून स्मार्ट सिटी ने पुरस्कृत केले आहे तसेच जगातील नकाशावर एक आगळे वेगळे स्थान निर्माण केलेले असून या औद्योगिक नगरी शहरामध्ये असे अनुचित प्रकार घडणे निश्चितच आश्चर्यकारक गोष्ट आहे. यासदर्भात महानरगपालिकाने ठोस पावले उचलावीत. अन्यथा आयुक्त कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले जातील.



मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; राष्ट्रवादीची मागणी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; राष्ट्रवादीची मागणी Reviewed by ANN news network on ५/२०/२०२३ ०६:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".