पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची छायाचित्रे डागाळली
दिलीप शिंदे
सोयगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्रे असलेले , सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे बॅनर, निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान असे बॅनर राज्य परिवहन महामंडळाच्या सोयगाव आगाराच्या बसगाड्यावर लावलेले आहे. या बॅनर वर प्रवाशांनी पान खाऊन पिंका टाकल्याने व उलट्या केल्या्ने छायाचित्रावर डाग पडले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे.सोयगाव आगारात बस गाड्या स्वच्छ केल्या जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची सर्वसामान्य जनतेला माहिती मिळावी याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्रे असलेले बॅनर परिवहन महामंडळाच्या सोयगाव आगाराच्या बस गाड्यावर लावले आहेत. मात्र प्रवाशी बस मधून प्रवास करीत असतांना बसच्या खिडकीतून थुंकत असल्याने प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रावर पान व तंबाखू खाऊन थुंकल्यामुळे व उलट्या केल्यामुळे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रावर डाग पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या बसगाड्या नीट धुतल्या जात नसल्याने छायाचित्रावरील डाग तसेच आहेत. यामुळे नागरिकांमधून खिल्ली उडवली जात आहे. विटंबना होऊ नये याकडे सोयगाव आगारासह शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२३ ०९:२७:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: