भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा; पिंपरी चिंचवड मधील अॅड. वीणा सोनवलकर यांचा समावेश




नवीन कार्यकारिणीमध्ये १२ उपाध्यक्ष८ सरचिटणीस१४ चिटणीसांचा समावेश

 

मुंबई : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष ,८ सरचिटणीस१४ चिटणीस आणि कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे.


उपाध्यक्षपदी प्रा. वर्षा भोसलेवैशाली चोपडेगिता कोंडेवारलता देशमुखमंगल वाघआम्रपाली साळवेरितू तावडेशौमिका महाडिककांचन कूलअॅड. अलका जांभेकरस्वाती भामरेजयश्री अहिरराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी मंजुषा कुद्रीमोतीछाया देवांग,स्वाती शिंदेमीना मिसाळरेखा हाकेअलका अत्रामरश्मी जाधवरचना गहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिटणीसपदी नयना वसानीअपर्णा पाटीलरुपाली कचरेसुनिशा शहाअर्चना वडनालक्षमा चौकसेशुभदा नायकगिता गिल्डारेखा वर्माअॅड. विणा सोनवलकररेखा डोळसरेश्मा शेखमाधुरी पालवेतृप्ती मामले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्षपदी भारती चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्च्याच्या नवीन पदाधिकारी संघटनात्मक कार्य चांगल्याप्रकारे करतील असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. तसेच उर्वरीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येतीलअसे चित्रा वाघ यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा; पिंपरी चिंचवड मधील अॅड. वीणा सोनवलकर यांचा समावेश भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा; पिंपरी चिंचवड मधील अॅड. वीणा सोनवलकर यांचा समावेश Reviewed by ANN news network on ५/३१/२०२३ ०४:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".