चिंचवड येथील बनावट पनीर तयार करणा-या महाराष्ट्र मिल्क डेअरीवर छापा; ६ जण अटकेत


पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने चिंचवड येथील बनावट पनीर तयार करणा-या कारखान्यावर छापा घालून ४ लाख ६६ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ६ जणांच्या टोळीला या प्रकरणी अटक केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र मिल्क डेअरीचा मालक साजीद मुस्तफा शेख वय ३२ वर्षे  व जावेद मुस्तफा शेख वय ३८ वर्षे, दोघेही राहणार रा.शिवर्तीथनगर, संभाजी बारणे यांचे ऑफीसजवळ, पडवळनगर थेरगाव पुणे, राकेश श्रीबुध्दराम सिंग वय २६ वर्षे, अल्ताफ हजरतद्दीन शेख वय २७ वर्षे, अभिषेककुमार योगेशबाबू यादव वय २२ वर्षे, सर्फराज शराफतउल्ला शेख वय ३५ वर्षे सर्व राहणार रा. महाराष्ट्र मिल्क डेअरी, सर्वे नं.२९५, चित्राव गणपती मंदीराजवळ चिंचवड पुणे  यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या कारखान्यातून बनावट पनीर तयार करण्याकरीता वापरत असलेले १४ हजार रुपये किंमतीचे १४० लिटर अॅसेटीक अॅसीड, ६ हजार ३२० रुपये किंमतीचे ६० लिटर आरबीडी पामोलीन तेल, ४ हजार ५००  रुपये किंमतीचे २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, ३ लाख ३२ हजार ५०० रुपये किंमतीची ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १ लाख ९ हजार २०० रुपये किंमतीचे ५४६ किलो बनावट पनीर असा एकूण ४ लाख ६६ हजार ५२०  रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या साहित्यापासून आरोपी बनावट पनीर तयार करून विकत होते.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना हवालदार प्रदीप गोडांबे व नाईक आशिष बोटके यांना या कारखान्यात बनावट पनीर तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह तेथे छापा घातला आणि मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले.

ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ  निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक निरीक्षक उध्दव खाडे, सहाय्यक उपनिरीक्षक अशोक दुधवणे, अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, चंद्रकांत जाधव, किरण काटकर यांनी केली.

चिंचवड येथील बनावट पनीर तयार करणा-या महाराष्ट्र मिल्क डेअरीवर छापा; ६ जण अटकेत चिंचवड येथील बनावट पनीर तयार करणा-या महाराष्ट्र मिल्क डेअरीवर छापा; ६ जण अटकेत Reviewed by ANN news network on ५/१०/२०२३ १०:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".