विधानपरिषदेच्या आमदार सौ.उमा खापरे आणि बॉर्न क्रेझी स्पोर्टस् क्लब यांच्या वतीने 1 ते 7 मे 2023 दरम्यान आमदार चषकचे आयोजन केले होते. डे-नाईट क्रिकेट स्पर्धा झाली असून पालकमंत्री मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पर्धेला भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच समारोपाला भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे मॉडेल अर्शिया राशिद, रवरंभा चित्रपटाची अभेनेत्री मोनालिसा बागल, चित्रपटाचे डायरेक्टर श्री.अनुप जगदाळे यांनी देखील उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
7 मे रोजी स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक 2 लाख 50 हजार रुपये व ट्रॉफी स्वराज्य 11 या गटाने पटकावले. द्वितीय 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम व ट्रॉफी प्रशांत भाऊ म्हाळस्कर ह्या टीमने पटकावले. तृतीय आणि चतुर्थ 1 लाख रुपये रक्कम व ट्रॉफी चे मानकरी यशवंत भाऊ पाचांगे व श्रीतेज 11 चाऱ्होली हे ठरले.
मॅन ऑफ द सिरीज मिळवण्याचा मान राहुल सातव या खेळाडूने मिळवला, त्यांना यामाहा FZ बाईक भेट देण्यात आली.
उत्कृष्ट गोलंदाज सलमान शेख यांना कुलर तर
उत्कृष्ट फलंदाज दत्ता पवार यांना देखील कुलर देण्यात आले.
याचप्रमाणे 40+ टीममध्ये
रहीम11 ह्या टीमने पहिला बक्षीस पटकावत 33000 रोख रक्कम व ट्रॉफी चे हकदार झाले.
शरद 11 ह्या टीमने द्वितीय बक्षीस पटकावत 22000 रोख रक्कम व ट्रॉफी चे हकदार झाले.
पुणे युनिव्हर्सिटी ह्या टीमने तृतीय बक्षीस पटकावत ट्रॉफी चे हकदार झाले.
तरंग मोबाईल ह्या टीमने चातुर्थ बक्षीस पटकावत ट्रॉफी चे हकदार झाले.
यात वैयक्तिक पारितोषिक देखील देण्यात आले. मॅन ऑफ सिरीज नंदू लोंढे, उत्कृष्ट गोलंदाज दत्ता पवळे
उत्कृष्ट फलंदाज गिरीष यांना बहुमान मिळाला.
महिलांनी देखील उत्तम सामना रंगवला गेम चेंजर ह्या टीमने पहिला बक्षीस पटकावत ट्रॉफी मिळवली.
ईगल्स ह्या टीम देखील ट्रॉफी ची हकदार झाली. महिलांमध्ये वुमन ऑफ सिरीज मिळवण्याचा मान प्रांजल म्हस्के यांनी मिळवला.
उत्कृष्ट फलंदाज दुर्गा शिंदे
उत्कृष्ट गोलंदाज माधुरी बनसोडे यांनी मिळवला.
खेळ म्हंटला की पडझड होते पण यावेळी आयोजक टीम ची तत्परता देखील महत्वाची असते. 2 खेळाडूंना सामन्यादरम्यान इजा झाली पण वेळेत डॉक्टर्स आणि ॲम्बुलन्स उपलब्ध असल्याने अपघात टाळता आला. खेळाडूंचा दवाखान्यातील खर्च बोन क्रेझी स्पोर्ट्स क्लब ने केला.
यावेळी आमदार सौ. उमा ताई खापरे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस श्री. अनुप जी मोरे, सौ. शैलजा ताई मोरे,ॲड. वर्षा डहाळे, श्री.अरुण थोरात, श्री. केशव घोळवे,श्री.राजेंद्र बाबर , समीर जावळकर, श्री. हंबीरराव आवटे, श्री.मिलिंद इनामदार, श्री. जयदीप खापरे, सौ. जागृती खापरे , श्री. सुशांत मोहिते, श्री. सतीश कुटे, श्री. सत्यन देशमुख, श्री. संतोष मुळीक, कुंदन चौधरी,कशिफ संगम
,मंगेश जोंधळे, प्रदीप साळवे तसेच बोंड क्रेझी स्पोर्ट्स क्लब चे सर्व सदस्य व खेळाडू उपस्थित होते.
निगडीत आमदार चषक स्पर्धा उत्साहात
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२३ ०३:२९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२३ ०३:२९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: