अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अवघ्या ६ तासात जेरबंद!

 


लोणावळा : आईच्या दुकानात नेऊन सोडतो असे सांगत एका बारा वर्षाच्या मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करणा-या तरुणाला अवघ्या ६ तासात जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे.

दीपक संजय सोनवणे (वय 28, रा. तुंगार्ली, लोणावळा) असे  आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास पीडित मुलीला, तिच्या आईच्या दुकानात नेऊन सोडतो असे सांगितले. त्यानंतर तिला बारा बंगला परिसरात असलेल्या निर्जन रेल्वे क्वार्टरमध्ये नेऊन तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित  केला. 

हा प्रकार कळल्यानंतर मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दिली पोलिसांनी तातडीने हालचाल करत अवघ्या तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीवर भा.दं.वि. कलम ३७६ खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदेश बावकर करत आहेत.


अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अवघ्या ६ तासात जेरबंद! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अवघ्या ६ तासात जेरबंद! Reviewed by ANN news network on ५/०६/२०२३ ०४:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".