पिंपरी : महापालिकेत स्थापन होणार शाश्वत विकास कक्ष

 


पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत "शाश्वत विकास कक्ष" सुरू करण्यात येणार आहे, याद्वारे पर्यावरण संवर्धन हवा,पाणी,ध्वनी प्रदूषण हरितीकरणजैवविविधताघनकचराआरोग्य,वाहतूक,एनर्जी कार्बन एमिशनक्लायमेट चेंज सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इकोसिस्टीम, ग्रीन बिल्डींग नदी पुनरुज्जीवन जलस्त्रोत पुनरुज्जीवन आदी घटकांचा  विचार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक  शेखर सिंह यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका अधिकारी, शासकीय अधिकारी,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची एकत्र बैठक महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीस उपस्थिताना मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.

यावेळी महापालिका आणि विविध विभाग व संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

 त्यापैकी काहींनी नाविन्यपूर्ण सूचना केल्या

बैठकीचे प्रास्तविक अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.  

पिंपरी : महापालिकेत स्थापन होणार शाश्वत विकास कक्ष पिंपरी : महापालिकेत स्थापन होणार शाश्वत विकास कक्ष Reviewed by ANN news network on ५/११/२०२३ ०६:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".