जळगाव : जळगाव शहरात ब्राईट यूथ फाउंडेशन या संघटनेचा प्रसार वेगाने होत आहे. झुमा बीवायएफ़चे अध्यक्ष शीबान फैज यांनी तांबापूर युनिट अध्यक्षपदासाठी युसूफ खान यांच्या नावाची घोषणा केली.
यावेळी बीवायएफचे उपाध्यक्ष अक्रम देशमुख, सचिव उमर फारूक, सोशल ग्रुपचे अध्यक्ष समीर खान, सोशल मीडियाचे अध्यक्ष रिजवान शेख आदी उपस्थित होते.फाऊंडेशनने माझ्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, मी फाऊंडेशन आणि समाजाची निराशा करणार नाही, मी पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे समाजहितासाठी काम करत राहीन असे बीवायएफ तांबापूरचे अध्यक्ष युसूफ खान यांनी सांगितले.
यावेळी बीवायएफचे अध्यक्ष शीबान फैज म्हणाले की, फाऊंडेशन तांबापूरमधील जनता, विद्यार्थी आणि तरुणांच्या पाठीशी सदैव उभे राहून एकत्रितपणे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. तांबापूर येथील प्रतिष्ठान शैक्षणिक कामांवर अधिक लक्ष देणार आहे.
Reviewed by ANN news network
on
५/२०/२०२३ ०७:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: