पिंपरी : मानवी क्रौर्याचा कळस गाठणारी घटना पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात घडली आहे. शुक्रवारी सकाळी काही जणांनी संत तुकारामनगर नजिक असलेल्या एच. ए. मैदानावर सहा डुकरांना जिवंत जाळलेआहे.
या प्रकरणी वकील प्रज्वल कमलेश दुबे (वय 29, रा.तुकाराम मगर, पिपंरी) यांनी पिंपरी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर सुनिल गजरे (वय 23), बबन गजरे (वय 19) रामदास गजरे (वय 40) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुबे कामानिमित्त जात असताना त्यांना काही जण गाडीमधून डुकरांना खाली उतरवताना दिसले. संशय आल्याने फिर्यादी यांनी त्वरीत महापालिका पशुवैद्यकीय विभागाला फोन केला. ‘अशी’ घटना घडत असून असा काही परवाना महापालिकेने दिला आहे का? याची विचारणा केली. यावेळी त्वरीत महापालिकेने आरोग्य निरीक्षकाला तेथे पाठवले.
फिर्यादी यांनी दरम्यान काही प्राणीमित्रांना तेथे बोलावले. जवळ जाताना त्यांना एक जिवंत डुक्कर दिसले पुढे काही
अंतरावर सहा डुकारांना जाळून टाकण्यात आले होते. त्यानंतर फ़िर्यादी आणि प्राणीमित्रांनी पोलिसांशीसंपर्क साधला व तक्रार दिली.
.
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२३ ०५:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: