सोमवार, २० मार्च, २०२३

पुणे : भारतीय विद्या भवनमध्ये २५ मार्च रोजी ' क्लिओपात्रा ' कार्यक्रम

कथकली माध्यमातून क्लिओपात्राच्या प्रेम कहाणीचे  सादरीकरण 

‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या  सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे ः ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'क्लिओपात्रा  '  या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे.शनीवार , २५ मार्च  २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच  वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.

  क्लिओपात्राच्या प्रेमकहाणी वरील सादरीकरण या कार्यक्रमात  कथकली च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. संकल्पना प्रबल गुप्ता (बंगळुरू)यांची असून संगीत सदनम सिवदास यांचे आहे.या सादरीकरणासाठी सदनम शिवदासन,सदनम ज्योतिष बाबू गायन करणार आहेत. 

‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५६ वा कार्यक्रम आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा