पुणे : ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्या ' अंकोरवाट ' या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन ६ ते ८ जानेवारी दरम्यान बालगंधर्व कलादालनात होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ.गो. बं.देगलूरकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शन रोज सकाळी १० ते रात्री साडेआठ दरम्यान सुरू राहणार आहे. उद्घाटन सत्रात 'संग्राहक श्री दिनकर(काका)केळकर छंदवेध पुरस्कार ' प्रदान करण्यात येणार आहेत. डॉ. आनंद केळकर, अजित गाडगीळ, डॉ. प्रकाश कामत, बापूजी ताम्हाणे, श्याम मोटे, विक्रम पेंडसे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.डॉ. श्रीकांत केळकर, सौ. अरुणा केळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या प्रदर्शनात कंबोडिया, बाली, बोलोबुदुर,श्री लंका येथील प्राचीन बौद्ध आणि हिंदू मंदिरांच्या १०० फोटोंचा समावेश असणार आहे. प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे ६,७,८ जानेवारी रोजी आहे. सकाळी १० ते रात्री ८.३० विनामूल्य खुले असणार आहे .
पुणे : 'अंकोरवाट ' छायाचित्र प्रदर्शन ६ जानेवारीपासून
Reviewed by ANN news network
on
१/०२/२०२३ ०७:४९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१/०२/२०२३ ०७:४९:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: