पिंपरी :सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंगळवारी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा



पिंपरी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चिंचवडगावातील महात्मा  जोतिबा फुले मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 3 जानेवारी) सायंकाळी पाच वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महात्मा जोतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी, सचिव विश्वास राऊत, कार्याध्यक्ष अनिल साळुंके, खजिनदार सूर्यकांत ताम्हाने, उपाध्यक्ष नरहरी शेवते यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

     यावेळी आदर्श माता म्हणून अंजनाबाई मारुतराव जमदाडे आणि प्रमिला प्रभाकर टिळेकर यांना तसेच सुरय्या सिकंदर शेख फातिमा यांना सावित्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच श्री गुरुमां मधु गोस्वामी विष्णू लोक फाउंडेशन यांनाही राज्यस्तरीय आध्यात्म भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुनिता राऊत, मधुरा भेलके, मंजिरी  धाडगे, विजया  गारुडकर, निशा बेलसरे, प्राजक्ता रुद्रवार, प्रमिला गोरे, सुचेता खोकले, वर्षा कांबळे, आशा कांबळे, माधुरी कोले, रोहिणी रासकर, रिद्धी गायकवाड, तृप्ती रामाने, अश्विनी दर्शले, श्रद्धा कातळे, सुनीताराजे पवार यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 

यावेळी मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक व माजी नगरसेवक वसंत  लोंढे, माजी महापौर अनिता फरांदे, राहुल जाधव, अपर्णा डोके तसेच उद्योजक दीपक  कुदळे, संजय  जगताप, प्रशांत डोके, माजी नगरसेवक सुरेश  म्हेत्रे, संतोष लोंढे, कांती शेठ भूमकर, मोहन  भूमकर, मोरेश्वर भोंडवे, सुरेश भोईर, वसंत बोराटे, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी नगरसेविका संगीता  ताम्हाणे, अश्विनी जाधव, रेखा दर्शले, करुणा चिंचवडे, अश्विनी  चिंचवडे, सुवर्णा बुर्डे, माजी नगरसेविका माधवी  राजापुरे, दिशा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत  आल्हाट, चांदखेडच्या सरपंच मीना  माळी, करमोळीचे सरपंच शरद केदारी, सुहास गार्डी, निवृत्ती आप्पा बोराटे, काळूराम   गायकवाड, धनंजय वर्णेकर, डॉ. विजय सातव, वंदना जाधव, रूपाली  आल्हाट, गणेश दळवी, किरण गायकवाड, समिता  गोरे, सोनम  जांभुळकर आदी उपस्थित राहणार आहेत.


 

पिंपरी :सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंगळवारी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पिंपरी :सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंगळवारी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा Reviewed by ANN news network on १/०१/२०२३ ०५:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".