पिंपरी : माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी यांच्यासह 100 हून अधिक कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

 

 

पिंपरी : माजी नगरसेवक  प्रकाश मलशेट्टीउद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव कुसाळकर  यांच्यासह काळेवाडीराहटणी परिसरातील 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेश केलेल्या या कार्यकर्त्यांचे उपनेतेखासदार श्रीरंग बारणे यांनी स्वागत केले.

 

खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन आणि जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांच्या प्रयत्नातून काळेवाडीराहटणी परिसरातील 100 पेक्षा अधिक इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. प्रकाश मलशेट्टी यांनी काळेवाडी परिसराचे महापालिकेत नेतृत्व केले आहे. या भागात त्यांची चांगली राजकीय ताकद आहे. त्यांनी आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकरशहरप्रमुख निलेश तरसशहर संघटक रवींद्र ब्रम्हेसमन्वयक हेमचंद्र जावळेड. प्रवीणकुमार गायकवाडउपशहर प्रमुख अंकुश कोळेकरतुकाराम कांचनउद्योजक रुपेश यादवदत्ता मोरेप्रदीप कुमारराजकुमार बालाजीरमेश जाधवमोतीराम देडेमनोहर गासडसुरेश पट्टेवरगौरव  नागणे,  संदिपान दाभाडेसुमित दाभाडेशिवाजी गरडजितेंद्र विश्वकर्माकुमार मोरेमहेश शहाराजेश विश्वकर्माअनिल विश्वकर्माबबलू विश्वकर्माप्रदीप शर्माशिवराम दळवीविजय एकशिंगेकिशोर एकशिंगेचेतन मोरेहरींद्र विश्वकर्मासुनील विश्वकर्माधर्मेंद्र विश्वकर्माकृपाशंकर शर्माकृपाशंकर विश्वकर्मा,  राजेंद्र भोसले,  मनोज विजयकर यासह अनेक कार्यकर्त्यांनी खासदार बारणे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या शिवसेनेत मोठ्या जल्लोषात फटाके वाजवून घोषणा देत प्रवेश केला.

 

''बाळासाहेबांच्या शिवसेनेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने  प्रवेश करत आहेत. आता माजी नगरसेवकही पक्षात येवू लागले आहेत. पक्षाचे मुख्य नेतेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रेरित होवून कार्यकर्ते पक्षप्रवेश करत आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आणि भाजपचे नेतेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची कार्यशैली राज्यातील जनतेला भावली आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास माजी लोकप्रतिनिधीकार्यकर्ते पसंती देत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संघटन मजबूत होत आहे. त्याचा आगामी महापालिका निवडणुकीत नक्कीच फायदा होईल'', असा विश्वास उपनेतेखासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

पिंपरी : माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी यांच्यासह 100 हून अधिक कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश पिंपरी : माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी यांच्यासह 100 हून अधिक कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश Reviewed by ANN news network on १/०२/२०२३ ०७:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".