लोणावळ्यात लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर छापा

 


लोणावळा : सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास लोणावळा शहरात राष्ट्रीय महामार्गालगत एका हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलीसपथकाच्या साहाय्याने छापा घातला.

यावेळी तेथे दोन महिलांकडून वेश्याव्यसाय करून घेतला जात असलयाचे त्यांना दिसून आले. या प्रकरणी हॉटेल मालक आणि त्याची महिला साथीदार यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला असून देहविक्रय करत असलेल्या महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

सत्यसाई कार्तिक यांना लोणावळा शहरातील सुदर्शन लॉजमध्ये वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीसपथकाने शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास तेथे छापा घातला. हाॅटेल मालक सतीश एच. शेट्टी (वय 59, रा. सुदर्शन हाॅटेल, मुंबई पुणे रोड लोणावळा) व त्याची महिला साथीदार तेथे दोन महिलांकरवी तेथे वेश्याव्यसाय करून घेता असल्याचे पथकाला आढळले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 भा. द. वि. कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांना सुधारगृहात पाठविले.

सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कारंडे, सहाय्यक फौजदार मारुती गोफणे, अण्णा बनसोडे, महिला पोलीस हवालदार मसळे, पोलीस काॅन्स्टेबल शिंदे, चालक दत्ता शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल करत आहेत.

लोणावळ्यात लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर छापा लोणावळ्यात लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर छापा Reviewed by ANN news network on १२/३१/२०२२ ०९:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".