कोकण : भारत भ्रमण यात्रेदरमयान रोलर स्केटींग खेळाडू सोनी चौरसिया उद्या खेडमध्ये

 


खेड: अखिल भारतीय  ग्राहक पंचायतीचे वाराणसी ( काशी) प्रांतची  महिला जागरण प्रमूख आणि बेस्ट रोलर स्केटींग खेळाडू सोनी चौरसिया ही आपल्या 20 सहकार्यांसह अतुल्य भारत रोलर  स्केटींग यात्रा करण्यासाठी निघाली आहे.  वाराणसीहून या  भारत भ्रमण यात्रेला प्रारंभ झाला आहे. या प्रवासात ती  ग्राहक पंचायतीच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार, स्केटींग खेळाचा प्रसार, विद्यार्थ्याना मार्गदर्शन, युवा युवतींना विविध प्रकारे प्रोत्साहन देणार आहे.

          खेडमधे २६ तारखेला दुपारी अडीच वाजता या यात्रचे आगमन होणार आहे.  तिचे भरणे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भव्य स्वागत करण्यात येणार आहे.त्याकरिता मुली आणि महिला, स्केटींग खेळाडू, ग्राहक कार्यकर्ते, विश्व हिन्दु परीषदेचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सोनी चौरसिया हि प्रत्यक्ष आपल्याशी त्यांचा अनुभव कथन करणार आहे. 26 नोव्हेंबर या दिवशी त्यांचा खेड येथे मुक्काम आहे. यावेळी  त्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

        सोनी चौरसिया याना  त्यांच्या या अतुल्य यात्रेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने खेडवासियानी  उपस्थित रहावे असे आवाहन श्रीकांत चाळके यांनी केले आहे. 

कोकण : भारत भ्रमण यात्रेदरमयान रोलर स्केटींग खेळाडू सोनी चौरसिया उद्या खेडमध्ये कोकण : भारत भ्रमण यात्रेदरमयान रोलर स्केटींग खेळाडू सोनी चौरसिया  उद्या खेडमध्ये Reviewed by ANN news network on ११/२५/२०२२ ०४:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".