पुणे : ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला विषयक विशेष उद्दीष्ट गटाकडून आयोजित 'बेसिक्स ऑफ वॉटर कलर ' या कार्यशाळेला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. ही कार्यशाळा उपासना मंदिर, ज्ञान प्रबोधिनी भवन येथे झाली. सुप्रसिद्ध जलरंग चित्रकार विलास कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.मिलिंद संत यांनी स्वागत केले.
विलास कुलकर्णी म्हणाले, ' वॉटर कलर या माध्यमातून चित्रकला सरावाने जमत जाते, त्यासाठी वेळ देणे महत्वाचे आहे. दडपण न घेता ब्रश सहजपणे फिरवता आला पाहिजे.आपले चित्र कसे येईल याची चिंता न करता चित्रकलेत रमता आले पाहिजे.
'रंगांची पॅलेट स्वच्छ असावी. त्यात थोडे थोडे रंग ट्यूब मधून काढून घ्यावेत, आणि पाणी घालून ठेवावे. ओघवत्या रंगातून आपल्याला कलाकृती सादर करायची असते. वॉटर कलर मध्ये ६ , ७ थरांमधून काम करावे लागतात. प्लेन वॉश, ग्रेडेड वॉश, व्हेरीगेटेड वॉश अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमी कागदावर ब्रशने तयार करून पुढील काम सुरू करता येते. जलरंग सहजपणे एकमेकात मिसळतात.ताजेपणा, तजेला हा जलरंग या माध्यमाचे वैशिष्ट्य आहे.फक्त पाण्याचा उपयोग करून जलरंगाची फिकट शेड करता येते, हे आणखी एक वैशिष्ट आहे. एका रंगानंतर दुसरा रंग वापरताना ब्रश स्वच्छ केला पाहिजे. आकारानुसार ब्रश बदलून , वॉशनुसार परिणाम साधता येतो. पाणी आणि रंग यांचे प्रमाण कमी जास्त करून देखील परिणाम साधता येतो ', असेही त्यांनी सांगीतले.१३ नोव्हेंबर रोजी देखील ही कार्यशाळा होणार आहे,असे यावेळी सांगण्यात आले.
दडपण न घेता जलरंगात रमा ! : चित्रकार विलास कुलकर्णी
Reviewed by ANN news network
on
११/०६/२०२२ ०६:२५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०६/२०२२ ०६:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: