भारतीय विद्या भवनमध्ये २२ ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाट

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम  

पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दिवाळी पहाट  कार्यक्रमाचे आयोजन शनीवार, २२ ऑक्टोबर  २०२२ रोजी सकाळी साडेसहा  वाजता  करण्यात आले आहे. अनुप जलोटा यांनी  गायलेल्या भजन, गझलांचा ' सुबह- ए-समर्पण ' हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.

'व्ही.पी.म्युझिक प्रॉडक्शन हाऊस ' निर्मित या कार्यक्रमात विवेक पांडे, प्रिशिता पांडे भजन, गझलांचे सादरीकरण करणार आहेत. प्रकाश सुतार ( कीबोर्ड ), सारंग भांडवलकर ( तबला ), प्रवीण जाधव ( संगीतवाद्य ) , अतुल गर्दे (गिटार ) हे साथसंगत करणार आहेत.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  १४४ वा कार्यक्रम  आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
भारतीय विद्या भवनमध्ये २२ ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाट भारतीय विद्या भवनमध्ये २२ ऑक्टोबर  रोजी दिवाळी पहाट   Reviewed by ANN news network on १०/१७/२०२२ ०२:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".