पिंपरी : विजयादशमीच्या दिवशी पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालय क्रीडांगणावर माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावतीने 70 फुटी रावण दहन व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालय क्रीडांगणावर भव्य 70 फुटी रावणाची प्रतिकृती तयार केली जात आहे. विजयादशमीच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. याचबरोबर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या शुभहस्ते सायंकाळी 7 वाजता दहनाचा कार्यक्रम होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे,माजी खासदार अमर साबळे,आमदार उमा खापरे,आमदार आण्णा बनसोडे,माजी महापौर उषा ढोरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जेष्ठ नेते आझम पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेननेचे माजी गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक सचिन चिखले आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने करण्यात आलेले असून कार्यक्रमाचे संयोजन उमेश खंदारे, हरीश वाघेरे, रवींद्र कदम, कुणाल सातव, प्रवीण कुदळे, नितीन गव्हाणे, संदीप गव्हाणे, राजेंद्र वाघेरे, सचिन वाघेरे, शेखर अहिरराव यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमास माजी नगरसेवक अमर मुलचंदानी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा