लोकप्रिय, बहुलाभ देणाऱ्या डीसीबी सुरक्षा एफडीचे पुनरागमन

गुरूग्राम : बँका सणासुदीच्‍या काळात अधिक उत्‍साह व आनंदाची भर कशाप्रकारे करतात? डीसीबी बँकेच्‍या आकर्षक डीसीबी फिक्स्ड डिपॉझिट व्याजदर आणि डीसीबी सुरक्षा एफडीसह अप्रतिम ऑफर्स आहेत. या दोन्ही ऑफर्स ग्राहकांना अधिक बचत आणि अधिक कमाई करण्यास सक्षम करतात.

डीसीबी सुरक्षा एफडी पुन्‍हा सादर करण्‍यात येत आहे. सुरक्षा एफडीसह मोफत ऑफर केलेली जीवन विमा योजना ग्राहकांसाठी एक अतुलनीय लाभ आहे. डीसीबी सुरक्षा एफडी ही फिक्‍स्‍ड ३ वर्षांची एफडी योजना आहे, जी ठेवीदारांसाठी तसेच त्यांचे आश्रित किंवा प्रियजनांसाठी बचत आणि सुरक्षिततेचे सर्वोत्तम संयोजन प्रदान करते.

सुरक्षा विम्याशिवाय नियमित मुदत ठेव देखील आकर्षक आहे. बँक ७०० दिवस किंवा ३ वर्षांच्‍या मुदत ठेवीवर प्रतिवर्ष ७.१० टक्‍क्‍यांचे आकर्षक व्‍याजदर देतेज्‍यामधून वर्षाला अनुक्रमे प्रतिवर्ष ७.४९ टक्‍के किंवा ७.८४ टक्‍के उत्‍पन्‍न मिळते. ज्‍येष्‍ठ नागरिक याच कालावधीसाठी प्रतिवर्ष ७.६० टक्‍के उत्‍पन्‍न प्राप्‍त करतात आणि उत्‍पन्‍न अनुक्रमे प्रतिवर्ष ८.०५ टक्‍के व प्रतिवर्ष ८.४५ टक्‍के आहे.

५ वर्षांच्‍या दीर्घकालीन मुदत ठेवीसाठी व्‍याजदर प्रतिवर्ष ७ टक्‍के आहे. म्‍हणजेच वार्षिक उत्‍पन्‍न प्रतिवर्ष ८.४३ टक्‍के आहे आणि ज्‍येष्‍ठ नागरिक प्रतिवर्ष ७.५० टक्‍के उत्‍पन्‍न प्राप्‍त करतातज्‍यामधून वार्षिक उत्‍पन्‍न प्रतिवर्ष ९.१४ टक्‍के मिळते१० वर्षांसाठी मुदत ठेव देखील उपलब्‍ध आहे.

आकर्षक लाभ – डीसीबी सुरक्षाची दोन विशिष्‍ट वैशिष्‍ट्ये आहेतजी स्‍मार्ट व सुरक्षित’ गुंतवणूक म्‍हणून ओळखली जातात. प्रथम ते तीन वर्षांच्‍या ठेवीवर प्रतिवर्ष ७.१० टक्‍क्‍यांचे सर्वोच्‍च व्‍याजदर देतात आणि दुसरेते सुरक्षा एफडीच्‍या रक्‍कमेइतके मोफत जीवन विमा संरक्षण किंवा सुरक्षा एफडी रक्‍कम १० लाख रूपयांपेक्षा अधिक असेल तर जवळपास १० लाख रूपये देतात. डीसीबी सुरक्षा एफडी ग्राहकांना विमा संरक्षणासाठी प्रीमियम (हप्‍ता) भरावा लागत नाही. तसेच जीवन विमा संरक्षणचा लाभ घेण्‍यासाठी वैद्यकीय चाचणी करण्‍याची आवश्‍यकता नाही. 

डीसीबी सुरक्षा फिक्‍स्‍ड डिपॉझिटची ठळक वैशिष्‍ट्ये:

·         मुदत ठेवीसाठी आकर्षक व्‍याजदर

·         डीसीबी सुरक्षा एफडी ३६ महिन्‍यांच्‍या मुदतीसह जीवन विमा संरक्षण देते.

·         सर्व डीसीबी सुरक्षा फिक्‍स्‍ड डिपॉझिट्ससाठी प्रथम अर्जदाराच्‍या नावे जवळपास १० लाख रूपयांचे अधिकतम जीवन विमा संरक्षण

·         विमा संरक्षण वयाच्‍या १८ वर्षांपासून ठेवीदार ५५ वर्षांचा होईपर्यंत वैध आहे.

·         संभाव्‍य ठेवीदार पॅननॉमिनेशन व ईमेल आयडी देत एफडीमध्‍ये गुंतवणूक करू शकतात.  

एनआरआयना देखील सुरक्षा लाभ आहेत!

तसेचडीसीबी एनआरआय सुरक्षा फिक्‍स्‍ड डिपॉझिट एनआरआयना मुदत ठेवीच्‍या रक्‍कमेनुसार आकर्षक परतावेतसेच मोफत जीवन विमा देते.

डीसीबी एनआरआय सुरक्षा फिक्‍स्‍ड डिपॉझिट्स भारतीय रूपयांमध्‍ये नॉन रेसिडण्‍ट एक्‍स्‍टर्नल (एनआरई)नॉन रेसिडण्‍ट ऑर्डिनरी (एनआरओ) मध्‍ये उपलब्‍ध आहेत.

डीसीबी एनआरआय सुरक्षा एफसीएनआर डिपॉझिट बुक करू इच्छिणारे एनआरआय यूएसडीएयूडीसीएडीयुरो किंवा जीबीपी यापैकी कोणत्‍याही परकीय चलनांचा वापर करू शकतात.

ग्राहकांमध्‍ये डीसीबी सुरक्षा एफडीची प्रबळ प्रतिष्‍ठा पाहता डीसीबी सुरक्षा एफडीचे पुन्‍हा सादरीकरण सुरक्षितता व खात्रीदायी परताव्‍यांना प्राधान्‍य देणाऱ्यांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहे.

लोकप्रिय, बहुलाभ देणाऱ्या डीसीबी सुरक्षा एफडीचे पुनरागमन लोकप्रिय, बहुलाभ देणाऱ्या डीसीबी सुरक्षा एफडीचे पुनरागमन Reviewed by ANN news network on १०/१७/२०२२ ११:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".