क्लब महिंद्राने शाश्वततेप्रती आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली

 



मुंबई: महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडच्या क्लब महिंद्राने 'शाश्वतताहा संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून स्वीकारला आहे. भारतीय हॉस्पिटॅलिटी उद्योगक्षेत्राने शाश्वततेचे अधिक जास्त पालन करण्यावर लक्ष केंद्रित केले असून देशभरातील कंपन्या यासंदर्भात अनेक उपाययोजना राबवत आहेत.  क्लब महिंद्राने सुरुवातीपासूनच शाश्वतता आपली वचनबद्धता मानून त्यादृष्टीने पावले उचलली आहेत आणि आता पुन्हा एकदा लोणावळामहाबळेश्वर व हतगड येथील रिसॉर्ट्समध्ये शाश्वततेसाठी आवश्यक उपाययोजना करून वचनबद्धतेचे पालन करण्याबाबत आपण दक्ष असल्याचे दर्शवले आहे.

सजीव सृष्टीजैवविविधता आणि विविध परिसंस्थांविषयी आदर राखण्याची परंपरा क्लब महिंद्रामध्ये नेहमीच पाळली जाते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीमधून ते दिसून येते. क्लब महिंद्रामध्ये शाश्वतता महत्त्वाची मानली जाते आणि तिला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. शाश्वततेप्रती आपली वचनबद्धता अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आरई१०० आणि ईपी१०० (नूतनीकरणीय ऊर्जा व ऊर्जा उत्पादकता) वर स्वाक्षऱ्या करणारी भारतातील पहिली हॉस्पिटॅलिटी कंपनी बनण्याचा मान क्लब महिंद्राने पटकावला. या कंपनीमध्ये एअर कंडिशनिंग सिस्टिम्सची क्षमता ईपी१०० कूलिंग चॅलेंजनुसार मोजली जाते. २०३० सालापर्यंत देशाच्या ऊर्जा उत्पादकतेमध्ये दुपटीने वाढ होण्यात२०४० सालापर्यंत कार्बन न्यूट्रल बनता यावे आणि २०५० सालापर्यंत १००% कामकाज नूतनीकरणीय उर्जेवर चालवता यावे यासाठी योगदान देत क्लब महिंद्राने अनेक शाश्वत प्रथांचे पालन केले आहेयामध्ये सोलर इन्स्टॉलेशन्सऊर्जा बचतजल संवर्धनकचऱ्याचे रिसायकलिंग आणि जैवविविधतेला प्रोत्साहन देणे यासारख्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे. क्लब महिंद्राच्या रिसॉर्ट्समध्ये सौर ऊर्जेचा लाभ घेतला जातो२०२०-२१ मध्ये जवळपास २२ मिलियन केडब्ल्यूएच ऊर्जा निर्मिती करण्यात आली. फ्लो रिस्ट्रिक्टर्स बसवूनसांडपाण्यावर पुनःप्रक्रिया आणि पुनर्वापर करून तसेच पावसाचे पाणी साठवून दरवर्षी २५० मिलियन लिटर सांडपाण्यावर पुनःप्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात यश मिळवले आहे. 

लोणावळाशेरवूडसाज - महाबळेश्वर आणि हतगड येथे क्लब महिंद्राने ९८ एमडब्ल्यूएच युनिट्स विजेची बचत केली आहे. ही वीज तब्बल ११४५ कुटुंबांना एक दिवसभर उजेड देऊ शकते. त्याचप्रमाणे याठिकाणी क्लब महिंद्राने दरवर्षी ४५ मिलियन लिटर सांडपाण्यावर पुनःप्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला आहे. हे पाणी तब्बल ९१२९ कुटुंबांची एका दिवसाची ताज्या पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे. त्यांनी आपल्या कार्बन उत्सर्जनामध्ये १०१७१ टन इतकी घट केली आहेहे म्हणजे १.६९ लाख झाडे लावण्यासारखे आहे. त्याचबरोबर त्यांनी ३० टन कचरा जमिनीमध्ये जाण्यापासून वाचवला आहे. हरियाली प्रकल्पामध्ये क्लब महिंद्राने १.५ लाखांहून जास्त झाडे लावली आहेत ज्यामुळे ९००० टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यात मदत मिळाली आहे. क्लायमेट ग्रुपच्या ईव्ही१०० उपक्रमाच्या वेळीत्यांच्या १४% वाहनांच्या ऐवजी इलेक्ट्रिक वाहने आणली गेलीत्यामुळे ३५०० लिटर डिझेलची बचत झाली व कार्बन उत्सर्जनात ९.१ टन घट झाली. 

क्लब महिंद्रा ब्रँडने भारत आणि परदेशातील आपल्या ८० पेक्षा जास्त रिसॉर्ट्समध्ये अनेक शाश्वत प्रथा लागू केल्या आहेतयामध्ये सोलर इन्स्टॉलेशन्सऊर्जा बचतजल संवर्धनकचऱ्यावर पुनःप्रक्रिया आणि जैवविविधतेचे संरक्षण यांचा समावेश आहे. 

क्लब महिंद्राने शाश्वततेप्रती आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली क्लब महिंद्राने शाश्वततेप्रती आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली Reviewed by ANN on १०/१३/२०२२ ०७:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".