एमक्युअरने केली आर्थिकदुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत

 


५७ पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण


पुणे : एमक्युअर  फार्मास्युटिकल्स या औषध निर्माण कंपनीने पुण्यातील महाविद्यालयात शिक्षण घेणा-या ५७ आर्थिकदुर्बल विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी मदत केली आहे. या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शुल्का पैकी ८० टक्के  भार एमक्युअर  फार्मास्युटिकल्स उचलणार आहे.


कंपनीच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सी. एस. आर.) च्या प्रयत्नांचा  हा एक भाग आहे. निवडलेले विद्यार्थी मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्ससायन्स अँड कॉमर्स येथे विविध अभ्यासक्रम शिकत आहेतया संस्थेबरोबर एमक्युअरचा सहयोग सात वर्षांपूर्वी पासून सुरू झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे  आवश्यक शुल्काची पूर्तता करता येत नाही त्यांना गरजेनुसार आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.हा उपक्रम म्हणजे उद्याच्या तेजस्वी मनांना त्यांच्या शिक्षणाच्या अत्यंत नाजूक टप्प्यात पाठिंबा देण्यासाठी एमक्युअरचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. गेल्या सात वर्षांत सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.
एमक्युअरने केली आर्थिकदुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत एमक्युअरने केली आर्थिकदुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत Reviewed by ANN on १०/१३/२०२२ ०७:५४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".