मुंबई : टायटन या टाटासमूहातील कंपनीने देशभरात एक लाखाहून अधिक झाडे लावण्याचा संकल्प केला असून त्यासाठी मॅरेथॉनच्या माध्यमातून ’गो ग्रीन’ हा उपक्रम सुरू केला आहे. याची सुरुवात टायटन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. के.. वेंकटरामन यांच्या हस्ते झाली
यावेळी बोलताना वेंकटरामन म्हणाले गो ग्रीन ही धरतीमातेशी एक होण्यासाठी सुरू असलेली एक कृती आहे. शाश्वत जीवन जगणे, पर्यावरणीय दृष्ट्या जबाबदारीने निर्णय घेणे, पर्यावरण पूरक पर्यायांचा अवलंब करणे आणि पर्यावरणा संवर्धनाच्या दृष्टीने हा एकमेव मार्ग आहे.
कंपनीच्या कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटीचे उपाध्यक्ष आणि प्रमुख एन. ई. श्रीधर यावेळी म्हणाले; आम्ही टायटन कंपनीत नेहमी आमच्या कामांमध्ये शाश्वतता अंतर्भूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. एक जबाबदार संस्था म्हणून आम्ही आमच्या सहका-यांच्सोया साथीने गो ग्रीन उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. हवामान बदलाविषयी जागरूकता आणणे हा आमचा मुख्य हेतू आहे
टाटा समूह आणि तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 1987 मध्ये टायटन वॉचेस लिमिटेड या नावाने ही कंपनी सुरू झाली. 1994 मध्ये टायटनने ज्वेलरी, त्यानंतर आयवेअर, परफ़्युम्स, कपडे यांच्या श्रेणी बाजारात आणल्या मागील आर्थिक वर्षात कंपनीने 27 हजार 200 कोटी रुपयांचे स्वतंत्र उत्पन्न नोंदवले आहे.
Reviewed by ANN
on
१०/११/२०२२ ०८:१७:०० PM
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: