पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे १५ कोटी ८६ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना आजच्या बैठकीत त्यांनी मंजुरी दिली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.
विविध विभागाकडील जुने व निरुपयोगी झालेले भंगार साहित्य ई-लिलावाद्वारे विक्री करणे तसेच महानगरपालिकेच्या परिसरात मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे महापालिकेसोबत संयुक्तरित्या राबविण्याबाबतच्या विषयाला आज झालेल्या बैठकीत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विषयांमध्ये विविध खर्चाच्या मान्यतेचा समावेश होता. यामध्ये निगडी येथील पीएमपीएमएल बस डेपो मध्ये बस चार्जिंग करीता उच्चदाब विद्युत पुरवठा घेण्याकरिता महापारेषण कंपनीस बे उभारणीच्या कामासाठी तसेच सुपरव्हिजन चार्जेस अदा करण्याबाबतच्या खर्चास, महापालिकेच्या नेहरू नगर व खराळवाडी येथील शाळा व इतर इमारतीचे रंगरंगोटी देखभाल दुरुस्ती व स्थापत्य विषयक कामांच्या खर्चास, महापालिकेच्या संगीत अकादमी मार्फत “दीपावली पहाट २०२२” या कार्यक्रम आयोजनाबाबतच्या खर्चास स्थायी समितीची मान्यता आवश्यक होती त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
या विषयांसह तरतूद वर्गीकरण आणि विशेष नियोजन प्राधिकरणाच्या कामकाजाकरीता मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या तसेच विविध कामांच्या मुदतवाढीच्या विषयांना देखील प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.
Reviewed by ANN
on
१०/०४/२०२२ ०७:४०:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: