पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरीया; राजेश पाटील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा अतिरिक्त कार्यभार
मुंबई : पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी ओमप्रकाश बकोरीया यांची नियुक्ती झाली आहे. तर पिंपरी पालिकेचे माजी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सध्या ते संचालक, सैनिक कल्याण या पदावर कार्यरत आहेत.तसे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी शुक्रवारी सायंकाळी काढले आहेत.
पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरीया; राजेश पाटील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा अतिरिक्त कार्यभार
Reviewed by ANN news network
on
१०/१४/२०२२ ०८:२३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/१४/२०२२ ०८:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: