पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी खास ललित संगीत अभ्यासक्रम सुरु झाला आहे. शहरातील सांस्कृतिक चळवळीसाठी सर्व कलाकारांनी एकत्र येण्याची गरज आहे. तेव्हाच सांस्कृतिक चळवळ वाढीस लागेल असे मत ललित कला केंद्र, विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
ललित कला केंद्र (गुरुकुल) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा थिएटर वर्कशॉप कंपनी संचलीत मराठी ललित संगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम चे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापालिकेचे माजी सह आयुक्त दिलीप गावडे , शहरातील विविध सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था – संघटनांचे प्रतिनिधी, गायक, कलाकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रवीण भोळे पुढे म्हणाले की, पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश हवा असतो. मात्र प्रवेशसंख्या मर्यादित असल्याने सर्वांनाच प्रवेश घेणे शक्य होत नाही. अशा स्थितीत अंश प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात प्रमाणात अभ्यासक्रम घेण्याची जबाबदारी थिएटर वर्कशॉप कंपनी संस्थेला दिली आहे. ही संस्था शहरात सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. शहरातील उदयोन्मुख कलाकारांना याचा नक्कीच फायदा होणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दिलीप गावडे म्हणावे की, शहरपातळीवर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु झाल्याने शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे. शहरात सुरु झालेला हा उपक्रम शहरासाठी अभिमानास्पद आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कस्तुरी पायगुडे- राणे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रभाकर पवार यांनी मानले.
Reviewed by ANN news network
on
१०/१७/२०२२ ०६:५४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: