पुणे - हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्त पुणे जिल्ह्यातील मंचर आणि भोर येथे वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी 26 सप्टेंबर 2022 या दिवशी अर्थात घटस्थापनेच्या दिनी हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला 20 वर्षे पूर्ण झाली. या द्विदशक-पूर्ती निमित्त संपूर्ण देशभरात 31 ऑगस्टपासून समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबविले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत विविध ठिकाणी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेणे व्याख्याने फलक प्रसिदध करणे, मंदिरांची आणि ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता आदी उपक्रम राबविले जात आहेत. मंचर आणि भोर येथे आयोजित केलेला वर्धापनदिन सोहळा हा या अभियानाचाच एक भाग आहे. भोर येथील श्रीमंत सौ. गंगुताई पंतसचिव वाचनालय सभागृह येथे 15 ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या वर्धापनदिनाला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, श्री. सुनील घनवट आणि ह.भ.प.श्री.संजय महाराज खुटवड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हलाल उत्पादने देशातून हद्दपार करण्यासाठी संघटित व्हा असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी केले. समितीच्या मार्गदर्शनानुसार आणि संतांच्या आशिर्वादाने सर्व हिंदूंनी संघटित होऊन धर्मरक्षणासाठी कार्य करावे असे आवाहन ह.भ.प.श्री. संजय खुटवड महाराज यांनी केले.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भोर व्यापारी संघटना, योग वेदांत समिती, प्रतापगड उत्सव समिती आदी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींसह 125 हुन अधिक धर्मपेमी उपस्थित होते.
मंचर येथे 18 ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या वर्धापनदिनाला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे, गावडेवाडीचे माजी सरपंच मा.श्री संतोष गावडे आणि ह.भ.प धर्माचार्य ॲड. शंकर महाराज शेवाळे उपस्थित होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात आपणही सहभागी झाले पाहिजे तसेच गायीच्या रक्षणासाठी आपण उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन गावडेवाडीचे माजी सरपंच मा.श्री संतोष गावडे यांनी व्यक्त केले. तर संतांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र पालट होतो. आज आपण संघटीत होऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे ह.भ.प धर्माचार्य ॲड. शंकर महाराज शेवाळे यांनी सांगितले.
भोर आणि मंचर पंचक्रोशीतील धर्मप्रेमींनी यावर्षी हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकून हलाल मुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला तसेच धर्मावरील आघातांच्या विरोधात संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा यावेळी सर्वांनी घेतली.
उत्साहपूर्ण वातावरणात भोर आणि मंचर येथे पार पडला हिंदु जनजागृती समितीचा वर्धापनदिन सोहळा
Reviewed by ANN news network
on
१०/२०/२०२२ १२:५२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/२०/२०२२ १२:५२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: