पिंपरी चिंचवड : आपत्ती व्यवस्थापनासाठी 'टेबलटॉप' कार्यशाळेचे आयोजन


पिंपरी :  सध्या वातावरणीय बदलांमुळे ऋतुचक्रात अनेक बदल होत असून ब-याचदा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. अशा परिस्थितीत महापालिकेसह सर्व  यंत्रणा प्रभावी आणि सक्षमपणे कार्यान्वित होत असताना समन्वयात उणीव राहू नये, कोणत्याही आपत्तीचे व्यवस्थापन करत असताना  सर्वसमावेशक अद्यावत माहिती तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर कामकाजात कसा करावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करताना तसेच त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी  सर्वसमावेशक सूक्ष्म नियोजनाचा अंतर्भाव त्यात आल्यास ते अशा कार्यशाळेचे फलित ठरेल, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.  

          पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पॅलेडियम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने  महापालिकेतील सर्व विभागांचे विभागप्रमुख, संबंधित अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, प्रशासन अधिकारी, सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंता, सहायक आरोग्य अधिकारी, अग्निशमन अधिकारी यांच्यासाठी कासारवाडी येथे हॉटेल कलासागर येथे पूर आपत्ती व्यवस्थापन ‘टेबल टॉप’ या संवादात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी यशदा याठिकाणी कार्यरत असणारे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ तथा सल्लागार कर्नल विश्वास सुपनेकर, पॅलेडियम  संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ  बालाजी चौहान आणि आदिती घोष यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संगणकीय सादरीकरणाद्वारे आपत्ती विषयक मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्याकडून आपत्तीविषयक प्रात्यक्षिके देखील करून घेण्यात आली.      

          या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरुगुडे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, सहशहर अभियंता संजय खाबडे, प्रमोद ओंभासे, डॉ. ज्ञानदेव झुंजारे, मनोज सेठिया, रामदास तांबे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, संदिप खोत, अजय चारठाणकर, विठ्ठल जोशी, रविकिरण घोडके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, थॉमस न-होना,  शिरीष पोरेडी, देवन्ना गट्टूवार, प्रेरणा सिनकर, विलास देसले, माणिक चव्हाण, अजय कुलकर्णी, अनिल शिंदे, प्रवीण घोडे, लता बाबर, सहायक आयुक्त वामन नेमाणे, सुषमा शिंदे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शितल वाकडे, विजयकुमार थोरात यांच्यासह सर्व सर्व क्षेत्रीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता, प्रशासन अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

          आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातून  तीन नद्या वाहतात. या नद्यांच्या धरण प्रवणक्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास अथवा  धरण पूर्ण भरल्यास  आणि पावसाची संततधार कायम राहिल्यास शहरात पूर परिस्थिती उद्भवू शकते. अशा वेळी महापालिकेचे सर्व विभाग आपत्कालीन परिस्थितीला सक्षमपणे व प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सज्ज  असणे गरजचे आहे. शिवाय आपत्तीमध्ये सहाय्य करणा-या इतर संबंधित यंत्रणांसमवेतचा संपर्क आणि समन्वय  देखील प्रभावी असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अद्यावतीकरणासाठी  ही कार्यशाळा महत्वाची ठरणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

          एखाद्या आपत्कालीन परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो किंवा कसे सामोरे जातो यावर कार्यशाळेत  चर्चा करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांचे वेगवेगळे गट करून त्यांना आपत्ती विषयक परिस्थितीचे नियोजन कसे करणार याबद्दल तसेच अशा परिस्थितीत आपण कोणते निर्णय घ्यावे, समन्वय कसा साधावा, किती वेळात कोणते काम होणे गरजेचे, कोणावर कोणती जबाबदारी देण्यात यावी, कोणी कोणती भूमिका बजवावी अशा विविध गोष्टींवर आपसांत चर्चा तसेच विचारविनिमय करून या परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे कसे जाता येईल याबाबत प्रात्यक्षिके  घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी केले. सूत्रसंचालन ध्रिती मित्रा यांनी केले, तर आभार पॅलेडियम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पटजोशी यांनी मानले.

पिंपरी चिंचवड : आपत्ती व्यवस्थापनासाठी 'टेबलटॉप' कार्यशाळेचे आयोजन पिंपरी चिंचवड : आपत्ती व्यवस्थापनासाठी 'टेबलटॉप' कार्यशाळेचे आयोजन Reviewed by ANN news network on १०/२०/२०२२ ०६:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".