लोणावळा : लोणावळ्यातील
भुशी धरणावर फिरायला आलेल्या घाटकोपर, मुंबई येथील एका १७ वर्षीय युवकाचा बुधवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला.
रोहन जोगींदर लाहोट (वय १७ वर्षे रा. ट्रांझीट कॅम्प, रमाबाई कॉलनी, घाटकोपर, मुंबई) असे त्याचे नाव आहे. खासगी शिकवणी वर्गाचे शिक्षक अमितकुमार जगदंबशरण पांडे आणि क्लास मधील इतर सहा विद्यार्थी मित्रांसोबत रोहन येथे आला होता. दुपारी २ च्या सुमारास पाय घसरून भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पडल्याने तो पाण्यात बुडाला.
लोणावळा शहर पोलिसांच्या मदतीने शिवदुर्ग मित्रचे सचिन गायकवाड, योगेश उंबरे, अशोक उंबरे, अमित भोसले, ओंकार पडवळ, सागर कुंभार, अमोल चिनुरे, राजेंद्र कडु, अजय मयेकर, अमोल परचंड, अमोल सुतार, सुनिल गायकवाड यांनी रोहन याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: