डिजिटल एज्युकेशनसाठी 'प्राइड ऑफ महाराष्ट्र' सन्मान

पुणे : डिजिटल एज्युकेशन क्षेत्रातील योगदानाबद्दल 'प्राइड ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार देऊन  कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीला  गौरवण्यात आले आहे.युनिव्हर्सिटीच्या वतीने संस्थापक सदस्य राकेश मित्तल यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.'किंगडम ऑफ टोंगा' या देशात स्थापन झालेले  हे विद्यापीठ २०१४ पासून वेगवेगळे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवत आले आहे. त्यामध्ये बी बी ए, बी सी ए, एम बी ए, एम सी ए आणि डीबीए या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. संशोधन क्षेत्रातील डॉक्टरेट देखील विद्यापीठाकडून दिली जाते.अनेक आंतरराष्ट्रीय ऑनलाईन अभ्यासक्रम या युनिव्हर्सिटी कडून चालू करण्यात आले आहेत.एमबीए आणि डीबीए डॉक्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या दोन ऑनलाईन कोर्सेसचा नोकरदार वर्गासाठी  चांगला उपयोग होत आहे.'मिरर,पुणे' संस्थेतर्फे जे.डब्ल्यू.मेरियट येथे हा सन्मान सोहळा  झाला. 
डिजिटल एज्युकेशनसाठी 'प्राइड ऑफ महाराष्ट्र' सन्मान डिजिटल एज्युकेशनसाठी 'प्राइड ऑफ महाराष्ट्र' सन्मान Reviewed by ANN news network on १०/१८/२०२२ ०६:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".