नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांनी घेतली पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट

 


नवी मुंबई : ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी शुक्रवारी नवी मुंबई पालिका मुख्यालयात येऊन नवनियुक्त पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. विविध विषयांवर चर्चेपूर्वी गणेश नाईक यांनी नार्वेकर यांचे स्वागत केले.


यावेळी आमदार नाईक यांच्यासोबत माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे पहिले आमदार संदीप नाईक, माजी नगराध्यक्ष सागर नाईक, माजी नगराध्यक्ष सुधाकर सोनवणे, दशरथ भगत, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, रवींद्र इथापे, अशोक पाटील यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शहरातील सिडको आणि एम. आय. डी. सी. चे भूखंड विकले जात असल्याबद्दल नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, रायगड आणि सिंधुदुर्गातील काही एजंट या विक्रीमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत असा आरोपही आमदार नाईक यांनी केला. यासंदर्भात आयुक्तांनी सिडकोसोबत बैठक आयोजित करावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांनी घेतली पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांनी घेतली पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट Reviewed by ANN news network on १०/१४/२०२२ ०५:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".