अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपतर्फे मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल

 

 

मुंबई : भारतीय जनता पार्टीतर्फे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांची उमेदवारी पक्षाने शुक्रवारी जाहीर केली. मुरजी पटेल मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.


 मुरजी पटेल यांनी निवडणूक अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह, खासदार मनोज कोटक आणि आमदार अमित साटम उपस्थित होते.


 बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मशाल हे चिन्ह सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आहे आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आहे. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार स्वीकारले आहेत. त्यामुळे उद्धवसेनेला मत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मत देणे आहे. अशा स्थितीत युतीचा पारंपरिक मतदार उद्धवसेनेला मतदान करणार नाही. या निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडून येतील.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपतर्फे मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत  भाजपतर्फे मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल Reviewed by ANN news network on १०/१४/२०२२ ०६:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".