तळेगाव दाभाडे : सहकार क्षेत्रात राज्य व देश पातळीवर 63 लाख पेक्षा जास्त सोसायट्या ऑनलाइन झाल्या असून बाकी सोसायट्याना लवकरात लवकर ऑनलाईन करण्याचे धोरण सरकारने आखले आहे.आपण किती चांगले काम करतो यावर पतसंस्थेचे भवितव्य अवलंबून असते असे प्रतिपदन माजी राज्यमंत्री श्री बाळा भेगडे यांनी केले
श्री डोळसनाथ पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बबनराव भेगडे यांना सहकार भूषण पुरस्कार सन्मान प्रदान करतान भेगडे बोलत होते. सभेच्या अध्यक्ष स्थानी पुणे पीपल्स कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष सुभाष मोहिते व प्रमुख व्यक्ते जेष्ठ लेखक पानिपतकर विश्वास पाटील होते. यावेळी मा राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनील शेळके, माउली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, गणेश काकडे व मावळ तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेमध्ये गेली 45 वर्षे सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल बबनराव भेगडे याना मानपत्र, फुलेपगडी व उपरणे देऊन सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त सी. आर. पी. एफ.चे डी. आय. जी. धीरजकुमार याना विशेष पुरस्कार देण्यात आला.
स्वागत संतोष भेगडे यांनी केले. प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे यांनी केले.या सभेत सभासदांना 11 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सूत्रसंचालन अतुल राऊत यांनी केले.
देशात 63 लाख सोसायट्या ऑनलाईन : बाळा भेगडे
Reviewed by ANN news network
on
१०/०१/२०२२ ०३:०७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/०१/२०२२ ०३:०७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: