पिंपरी : पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवार दि.2 ऑक्टोबर रोजी शहरातील विविध भागात 16 स्थानी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रहित,सेवाकार्यासाठी सदैव कटिबद्ध असणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील 16 विविध भागात मोठ्या संख्येने स्वयंसेवक, नागरिक या उत्सवात सहभागी होणार आहेत. या वेळी शारीरिक, घोष प्रात्याक्षिके, गीत, या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन, वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर दि.5 ऑक्टोबर रोजी विविध भागात पथसंचलनाचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी दिली आहे.
विविध भागातील कार्यक्रम स्थान खालील प्रमाणे -
संभाजी नगर- वक्ते : पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रमुख पाहुणे :डॉ. ललितजी कुमार धोका ( संस्थापक - ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशल स्कूल ),ठिकाण : रामायण मैदान, जाधववाडी वेळ : सकाळी 8:00 वा.
ंर्देहुरोड नगर-वक्ते : रुपेश यादव, ठिकाण : महात्मा गांधी विद्यालय, देहूरोड, वेळ : सायंकाळी 5:00 वा.
ंर्देहूनगर- वक्ते : शैलेश शिंदे, प्रमुख पाहुणे : डॉ. स्वप्नील चौधरी ( नेत्ररोग तज्ञ, कवी ), स्थान - श्रीकृष्ण मंदिरा शेजारी ( माळीनगर- देहू ), वेळ - सायंकाळी 6:00 वा.
ंर्निगडीनगर-वक्ते : सुहास महाजन(प.म. प्रांत, घोष प्रमुख), ठिकाण : राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, मोहननगर, वेळ : सायंकाळी 6:00
चिखली- वक्ते : जयंत जाधव, प्रमुख पाहुणे : यादवेंद्र जोशी संचालक प्रज्ञानबोधिनी चिखली, स्थान - गणेश इंटरनॅशनल स्कूल, नेवाळे वस्ती, चिखली, सायं. 5:30
पिंपळे सौदागर - वक्ते : अमोल पुसदकर, स्थान:- पि. के. इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे सौदागर, वेळ : सायं .5:30
पिंपळे निलख-वक्ते : सुधीर गाडे, स्थान:- चोंधे पाटील स्पोर्ट कॉम्प्लेक्स, पिंपळे नीलख, वेळ : सायं 6वाजता
काळेवाडी-वक्ते :- रविकांत कळंबकर, स्थान:- बेबिज इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी, वेळ : सायं 6वाजता
पिंपरी :- वक्ते :- केदार तापकीर,स्थान:- नव महाराष्ट्र शाळा ,पिंपरी, वेळ : 2 ऑक्टो. सकाळी 7 वाजता
चिंचवड पूर्व, पश्चिम- वक्ते:- सुनिल देसाई, स्थान:- कामगार कल्याण मंडळ मैदान, उद्योग नगर चिंचवड, वेळ : 2ऑक्टा.े सायं 5:30वाजता
हिंजवडी गट ( आकुर्डी, रावेत, वाकड, हिंजवडी , पुनावळे) - वक्ते:- नानासाहेब जाधव, प.महाराष्ट्र प्रांत संघचालक, प्रमुख पाहुणे : डॉ जे के सोळंकी , राष्ट्रीय रेडीओ खगोल भौतिकी केंद्र, संशोधन संस्था, स्थान:- कांतीलाल खिंवसरा शाळा, वाकड, वेळ : सायं 5वाजता
भोसरी गट- वक्ते:- अतुल अग्निहोत्री, प्रमुख अतिथी - प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाफारे, एम.आय. टी.आळंदी, स्थान:- न्यू संत तुकाराम पॅलेस हॉल, वेळ : सायं.5.30
सांगवी गट- संत तुकाराम नगर -वक्ते - केदार तापकीर, स्थान : डॉ. हेडगेवार क्रिडा संकुल, वेळ : सायं.6.30
कासारवाडी -वक्ते - विलास पवार, स्थान-पी सी एम सी शाळा कासारवाडी, वेळ : सायं.6
पिंपळे गुरव- वक्ते - सचिन कुलकर्णी, स्थान : रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव, वेळ : सायं.6
सांगवी - वक्ते - निलेश लाळे, स्थान- न्यू मिलेनियम हायस्कूल, सांगवी , वेळ : सायं.6.30
-----------------------------------------
Reviewed by ANN news network
on
१०/०२/२०२२ ११:४६:०० AM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: