गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२
बिर्ला रुग्णालयात गुंतागुंतीची मुखकर्करोग शस्त्रक्रिया यशस्वी
बिर्ला रुग्णालयात गुंतागुंतीची मुखकर्करोग शस्त्रक्रिया यशस्वी
चिंचवड : येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात गुंतागुंतीच्या मुखकर्करोगावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
सीजीसीएस अंतर्गत हे उपचार मोफत करण्यात आले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आर्थिक झळ न पोहोचता रुग्णाला उत्तम दर्जाचे उपचार मिळाले.
एका 45 वर्षीय महिलेवर बिर्ला हॉस्पिटलमधील कर्कशल्यविशारद डॉ. पंकज क्षीरसागर उपचार करत होते. या महिलेला मुखाचा कर्करोग झाला होता.मुखकर्करोगावरील शस्त्रक्रियेनंतर व्यंग निर्माण होऊ शकते. त्यामुळे रुग्ण महिला घाबरलेली होती. तिचे समुपदेशन केल्यानंतर तिने शस्त्रक्रियेसाठी मंजुरी दिली.
बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. यासाठी डॉ. पंकज क्षीरसागर, डॉ. प्रणव ठुसे, डॉ. मोहंती, डॉ. पूजा कुलकर्णी आणि सर्व इतर नर्सिंग व आयसीयू वॉर्ड कर्मचारी व परिचारिका यांनी श्रम घेतले.
-----------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा