नवरात्री निमित्त १ ऑक्टोबर रोजी 'जल 'दुर्गांचा गौरव

रोटरी जल संवर्धन समिती, रोटरी च्या ९ महीला अध्यक्ष आणि संस्कार भारतीचा उपक्रम पुणे : नवरात्री निमित्त पाणी व पर्यावरण क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव समारंभ रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ची जल संवर्धन समिती ,रोटरी क्लब च्या नऊ महिला अध्यक्ष आणि संस्कार भारतीतर्फे आयोजित करण्यात आला आहे. उमा असलेकर(पुणे),डॉ. संध्या दुधगावकर, (परभणी),डॉ. धनश्री पाटील,( कोल्हापूर), डॉ. स्वप्नजा मोहिते ( रत्नागिरी), शालू कोल्हे, (गोंदिया) या 'जल ' दुर्गांचा सन्मान 'पर्याय ' या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक सीमंतिनी खोत यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. १ ऑक्टोंबर २०२२ रोजी इचलकरंजी सभागृह, कर्वे शिक्षण संस्था, ( कर्वेनगर ) येथे संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे संयोजन रोटरी क्लब ऑफ पूना, रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट, रोटरी क्लब ऑफ पूना मिड टाऊन,रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर,रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टसाईड,रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज,रोटरी क्लब ऑफ निगडी -आकुर्डी या क्लबच्या महिला अध्यक्षांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. पाण्यासाठी प्रयत्नरत 'जल ' दुर्गांचा सन्मान पाणी व पर्यावरण विषय लोकांचा प्राधान्य विषय बनवणे. त्यासाठी त्या क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्ती व त्यांचे काम समाजापुढे आणणे. इथे विशेषतः महिलांचे काम लक्षात घेउन त्यांच्या कामाची दखल घेणे, समाजाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करणे व इतरांना त्यांच्या कामामुळे दिशा व प्रेरणा मिळणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे संयोजकांच्या वतीने मैथिली मानकवड, सतीश खाडे यांनी सांगीतले.
नवरात्री निमित्त १ ऑक्टोबर रोजी 'जल 'दुर्गांचा गौरव नवरात्री निमित्त १ ऑक्टोबर रोजी 'जल 'दुर्गांचा गौरव Reviewed by ANN news network on ९/२९/२०२२ १२:२५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".