पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप जांभळे
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी वसई विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची नियुक्ती झाली आहे. या बाबतचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी गुरुवारी काढले आहेत. त्यामुळे उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी बसण्याची संधी हुकली आहे. विकास ढाकणे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी झगडे यांची नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांना त्या पदावर रुजू करून घेण्यात आले नव्हते. जांभळे यांच्या नियुक्तीमुळे या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे.त्या उपायुक्तपदीच राहणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा