आमदार बनसोडे यांच्या निधीतून फुगेवाडी मशिदीत सीसीटीव्ही

पिंपरी : जामा मस्जिद, फुगेवाडी येथे आमदार अण्णा बनसोडे यांच्या स्थानिक विकास निधीतून सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले. त्याचे उदघाटन आमदार अण्णा बनसोडे यांच्याच हस्ते करण्यात आले. सीसीटीव्हीमुळे फुगेवाडी जामा मस्जिदच्या परिसरात सुरक्षित वातावरण निर्मिती होईल त्यामुळे तिथे प्रार्थनेसाठी येणार्‍या नागरिकांमध्ये तसेच मदरशामध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये विश्वासार्हता तयार होईल असा विश्वास जामा मस्जिद फुगेवाडीच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. मुस्लिम समाजाला कोणतीही अडचण आली तर सर्वात प्रथम आमदार अण्णा बनसोडे धावून येतात व प्राधान्याने त्या समस्यांचे निराकरण करतात यासाठी संपूर्ण मुस्लिम समाजाचे वतीने आमदार अण्णा बनसोडे साहेबांचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया जामा मशिदीचे अध्यक्ष बादशहा शेख यांनी वक्त केली. उदघाटन प्रसंगी मेहमूद सय्यद, माजी नगरसेविका संध्या गायकवाड, स्वाती काटे, संजय औसरमल, सतिश लांडगे, प्रा. मनोज वाखारे, लतिफ सय्यद, संजय गरूड, दीपक शिंदे, हरेश पुजारी यांच्या समवेत जामा मशिदीचे पदाधिकारी उपास्थित होते.
आमदार बनसोडे यांच्या निधीतून फुगेवाडी मशिदीत सीसीटीव्ही आमदार बनसोडे यांच्या निधीतून फुगेवाडी मशिदीत सीसीटीव्ही Reviewed by ANN news network on ९/२५/२०२२ ०६:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".