प्राधिकरणातील कचरा संकलन केंद्राचे काम नागरिकांनी थांबविले
निगडी : पिंपरी चिंचवड महापालिका कचरा संकलनासाठी इंदूर मॉडेल राबवीत आहे. त्यानुसार शहरात 4 ठिकाणी कचरा संकलन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यातील एक केंद्र प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 26 येथे उभारण्याचे महापालिकेने ठरविले असून त्याला स्थानिकांचा विरोध आहे.
महापालिकेच्या अधिकार्यांनी हे काम गुरुवारी सुरू करण्याचा प्रयत्न केला असता माजी नगरसेवक अमित गावडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी तेथे विरोध करत हे काम बंद पाडले.
हे केंद्र दाट लोकवस्तीत उभारले जात आहे. त्यामुळे ते दुसरीकडे स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी आहे.याबाबत नागरिकांनी वारंवार पत्रव्यवहार केला असून आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून निवेदनही दिले आहे. त्यानंतरही प्रशासनाने पुन्हा काम सुरु करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तिथे जाओन गावडे यांच्यासह नागरिकांनी ते थांबविले.
कचरा संकलन केंद्राची जागा रिंगरोडची आहे. आजूबाजूला लोकांची घरे आहेत. लोकांना कचर्याची दुर्गंधी सहन करावी लागेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.
---------------------------
प्राधिकरणातील कचरा संकलन केंद्राचे काम नागरिकांनी थांबविले
Reviewed by ANN news network
on
९/२२/२०२२ ०५:३५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/२२/२०२२ ०५:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: