पिंपरी : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक विभागीय आयुक्त सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे पार पडली.
यावेळी, महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, नामनिर्देशित संचालक ममता बत्रा, स्वतंत्र संचालक यशवंत भावे, प्रदीपकुमार भार्गव, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (ऑनलाईन), सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनिल भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहा.मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे यांच्यासह अधिकारी तसेच सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांचा सर्विस्तर आढावाघेण्यात आला. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निश्चित केलेल्या कालमर्यादेबाबत संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले. तसेच, टेक महिंद्रा आणि एल अँड टी कंपनीच्या प्रतिनिधींसोबत प्रत्यक्ष चर्चा करून प्रकल्प अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या. सन 2021-22 या आथिर्क वर्षाचा ताळेबंद मंजूर करून वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे मंजूरीसाठी शिफारस करण्यात आली. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित घेण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या बैठकीमध्ये प्रकल्प सल्लागार यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या विकास प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सादरीकरण केले. त्यावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेण्यात आले. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक
Reviewed by ANN news network
on
९/२६/२०२२ ०४:५१:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/२६/२०२२ ०४:५१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: